पुणे जिल्ह्यात 75 हजार मतदार वाढले

पुणे जिल्ह्यात 75 हजार मतदार वाढले
Published on
Updated on

पुणे : 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा'अंतर्गत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.5) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 79 लाख 51 हजार 420 मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून, यादीत 74 हजार 470 मतदारसंख्येची भर पडली आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार, 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम' 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला. या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 74 हजार 470 इतक्या मतदारांची वाढ झालेली असून, त्यात पुरुष मतदार संख्या 35 हजार 598 इतकी महिला मतदार संख्या 38 हजार 721 इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या 151 ने वाढलेली आहे.

त्यानुसार जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदार संघात एकूण 79 लाख 51 हजार 420 इतके मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 41 लाख 66 हजार 265, महिला मतदारांची संख्या 37 लाख 84 हजार 660 व तृतीयपंथी मतदारांची संख्या 495 इतकी आहे.

मतदारसंघनिहाय मतदार
जुन्नर – 3,08,202, आंबेगाव -2,98,022, खेड-आळंदी – 3,36,320, शिरूर -4,12,896, दौंड – 3,04,545, इंदापूर – 316305, बारामती – 357993, पुरंदर – 409709, भोर – 393142, मावळ – 359962, चिंचवड – 566415, पिंपरी- 357207, भोसरी – 5,13,761, वडगाव शेरी – 433022, शिवाजीनगर – 2,74,103, कोथरूड – 3,91,520, खडकवासला – 5,08,172, पर्वती – 3,30,819, हडपसर – 5,36,397, पुणे कॅन्टोमेंट 2,67,480 आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 2,75,428 मतदार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news