पुणे : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्ष 2023-24 मध्ये पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी फेब—ुवारी महिनाअखेर उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीची (एफआरपी) देय रक्कम 2 हजार 383 कोटी रुपये आहे. त्यापैकी साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या बँक खात्यावर ऊसतोडणी वाहतूक खर्चासह 2 हजार 365 रुपये म्हणजे सुमारे 99.24 टक्क्यांइतकी रक्कम जमा केलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 14 पैकी 9 साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी यंदाचा हंगाम एफआरपीची रक्कम मिळण्यात चांगला गेल्याने एकूणच साखर हंगाम गोड झाल्याचे स्पष्ट होते.
एफआरपीची शंभर टक्क्यांहून अधिक देण्यामध्ये श्रीसोमेश्वर, भीमाशंकर, माळेगाव, विघ्नहर, श्रीछत्रपती, संत श्रीतुकाराम या सहा सहकारी साखर कारखाना आणि व्यंकटेशकृपा शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा व पराग अॅग्रो फुड्स या तीन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. त्या खालोखाल कर्मयोगीने 97.20 टक्के, भीमा पाटस (साईप्रिया शुगर) सहकारीने 82.87 टक्के तर निरा- भीमाने 64.51 टक्के रक्कम दिलेली आहे.
एफआरपीची सर्वाधिक रक्कम बारामती अॅग्रो या खासगी कारखान्याने दिली असून, ती 337.40 कोटी रुपये आहे. सोमेश्वर सहकारी 286.96 कोटी, माळेगाव 248.54 कोटी, दौंड शुगर 236.66, भीमाशंकर सहकारी 223 कोटी रुपये शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केलेले असल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयातून देण्यात आली.
कारखाना देय रक्कम दिलेली रक्कम टक्के
हेही वाचा