पत्रकार आल्याचे पाहताच ‘आरटीओ’ पथकाचे पलायन!

पत्रकार आल्याचे पाहताच ‘आरटीओ’ पथकाचे पलायन!

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपामध्ये आराम करण्यासाठी थांबलेल्या मालवाहतूक वाहनांची चौकशी करण्यास आलेल्या 'आरटीओ' पथकाने पत्रकार चौकशीसाठी आल्याचे पाहताच घटनास्थळावरून धूम ठोकल्याने 'आरटीओ'च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पथकाच्या पळून जाण्याने त्यांच्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर माकरवस्तीसमोर असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे. माकरवस्तीसमोर असलेल्या पेट्रो पंपावर तीन माल भरलेले ट्रक उभे होते.

चालक गाडीत आराम करीत होते. या ठिकाणी चारचाकी गाडीमधून 'आरटीओ' पथक आले होते. त्यातून एक जण शासनाच्या गणवेशात खाली उतरला. त्याने चालकांना दम देऊन उठवले. 'चल गाडीत बस' असे चालकाला सुनावत तो ही गाडीत बसला असता ट्रकचालक मालकाला फोन करण्यासाठी गाडीतून खाली उतरला. त्याचवेळी दै. 'पुढारी'चे प्रतिनिधी तेथे पोहचले. त्यांनी 'साहेब काय झाले?' असे विचारले असता गाडी वजन करण्यासाठी काट्यावर घेऊन जात आहे, असे 'आरटीओ' पथकातील एकाने सांगितले.
या वेळी पथकाचा फोटो काढताच आत बसलेल्या एका अधिकार्‍याने खाली उतरलेल्या अधिकार्‍याला 'चल गाडीत बस' अशी सूचना करताच सर्वजण गाडीत बसून निघून गेले. 'आरटीओ' अधिकारी अचानक का पळाले? हा विषय मात्र अनेक प्रश्न पाठीमागे सोडून गेला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news