शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही : खा. सुळेंचे अमित शहांना उत्तर | पुढारी

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही : खा. सुळेंचे अमित शहांना उत्तर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गेली ५५ वर्षांपासून राज्यात केंद्रातून कोणीही नेता आला तरी शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही, हे त्यांना माहित असते. त्यामुळे टीका केली जाते, या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, यापूर्वी अमित शहा जेव्हा राज्यात यायचे तेव्हा राष्ट्रवादीवर ते नॅचरली करप्ट पार्टी असा आरोप करायचे. आता ते आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत नाहीत. लोकशाहीत त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.

पवार कुटुंबाकडून सुळे यांचा प्रचार केला जात आहे, याबाबत त्या म्हणाल्या, आम्ही घरात कोणाला कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. युगेंद्र हे त्यांचे दौरे करत आहेत. परंतु माझ्या सर्वच निवडणूकांमध्ये माझे भाऊ, बहिणी, वहिणी, भाचे व कुटुंबातील अन्य सदस्य खूप परिश्रम घेत असतात. कुटुंबात ज्यांना माझा प्रचार करण्याची इच्छा आहे, ते करतील. प्रत्येक निवडणूकीत कुटुंबाचा मला मोठा आधार असतो. लोकसभेची निवडणूक आता तोंडावर आहे, जो तो आपापला प्रचार करतो आहे. आम्हीही आमचे काम सुरु केले आहे.
३ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, मी त्या दिवशी बारामतीच्याच दौऱयावर होते. माझ्या दौऱ्याची अखेर लाटे या गावामध्ये रात्री सव्वा दहाला झाली. त्यामुळे अशी भेट झाली असेल का तुम्हीच विचार करा.

हेही वाचा

 

Back to top button