वनमजुरांच्या समस्या निकाली काढणार : मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांची ग्वाही | पुढारी

वनमजुरांच्या समस्या निकाली काढणार : मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांची ग्वाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुख्य वनसंरक्षक पुणे यांचा कार्यालयीन दालनात वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांचा सेवा विषयक तक्रार निवारण सभा महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे शिष्टमंडळासह केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांचा नेतृत्वात पार पडली. संघटनेचा निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.

तक्रार निवारण सभेत विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढणे, ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविणे जेणेकरून क्षेत्रीय कर्मचार्‍यांना न्याय मिळेल, कर्मचार्‍यांची सेवापुस्तक अद्यावत करणे, प्रवास भत्ता, वेतनवाढीची थकबाकी, वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणे, ऑनलाइन बदली प्रकिया राबविणे, प्रत्येक महिन्याचा पाच तारखेच्या आत पगार होणे, कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे, वनक्षेत्राचे पक्के सीमांकन व नकाशे तयार करून मिळणे, गोपनीय अहवाल, वन क्षेत्रीय कर्मचार्‍यांचा विमा काढणे, वन कल्याण निधीबाबत, घर बांधणी, वाहन व संगणक अग्रीमबाबत, तपासणी नाका व निवासस्थानाची दुरुस्ती व नवीन बांधकाम करणेबाबत, नियमित गणवेश पुरवठा करणेबाबत, कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरविणेबाबत, नियत वनरक्षकांना नियमित बीट मदतनीस देणेबाबत, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेत तर कामाचा निधी वर्ग न करणेबाबत, वनरक्षक वनपालांच्या एकापाल्यास भरती प्रक्रियेत प्राधान्य देणेबाबत, क्षेत्रीय कर्मचार्‍यांना गस्ती करण्यासाठी शासकीय मोटारसायकलवाहनाचा पुरवठा करणेबाबत, वन वनवा नियंत्रण याबाबत अद्यावत तंत्रज्ञान विकसित करून उपाययोजना करण्याबाबत, अतिक्रमण नियंत्रणात आणण्याकरिता उपग्रह प्रणालीचा वापर करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते, उपवनसंरक्षक सोलापूर धैर्यशील पाटील, विभागीय वन अधिकारी कॅम्पा राम धोत्रे, सहायक वनसंरक्षक शीतल राठोड आदी वन अधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या शिष्टमंडळात केंद्रीय उपाध्यक्ष विशाल मंत्रीवार, शिबसांब घोडके, बी. एम. बुरुंगले, प्रीती नागले, अर्चना कोरके, अश्विनी देशमुख यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button