रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या ऑनलाइन उद्घाटन | पुढारी

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या ऑनलाइन उद्घाटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे उद्घाटन उद्या बुधवारी (दि. 6) तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे. यामुळे येरवडा, रामवाडी आणि विमानतळ (लोहगाव) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोच्या पहिल्या दोन टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुण्यात उपस्थित राहून केले होते. त्यामुळे मेट्रो अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या पुण्यातील नेत्यांना तिसर्‍या टप्प्याचे उद्घाटनदेखील त्यांच्याच हस्ते पुण्यात प्रत्यक्ष हजर राहून व्हावे, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. परंतु, आता रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या तिसर्‍या टप्प्यातील मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मेट्रोचे तीन टप्पे…

मेट्रोचा पहिला टप्पा असलेला वनाज ते गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक आणि पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पुण्यात उपस्थित राहून मार्च 2022 मध्ये केले होते. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्येसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दापोडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक या मार्गाचे उद्घाटन पुण्यात येऊनच केले. तिसर्‍या टप्प्याचे म्हणजेच रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचेदेखील उद्घाटन त्यांच्याच हस्ते प्रत्यक्ष उपस्थितीत व्हावे, अशी मेट्रो अधिकारी आणि नेत्यांची इच्छा आहे. मात्र, तसे झाले नाही, आता 6 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे म्हणजेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन होईल.

मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 6 मार्च 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येईल.

– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो.

हेही वाचा

Back to top button