विद्यापीठ परिसरातून चंदनाची दोन झाडे चोरीला

विद्यापीठ परिसरातून चंदनाची दोन झाडे चोरीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 2 चंदनाची झाडे कापून नेल्याची घटना घडली. याबाबत अशोक मिटकरी यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (29 फेब्रुवारी) रात्री अकारा ते साडेअकाराच्या दरम्यान घडली. शहरात गेल्या वर्षभरापासून घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय संस्था, खासगी संस्था तसेच बंगल्यांच्या आवारात शिरून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली. चंदनचोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक मिटकरी हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे कर्मचारी असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरक्षारक्षक आहेत.

अशोक मिटकरी हे गुरुवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी टीचर क्वार्टरजवळ आणि जयकर लायब्रेरीच्या पाठीमागे झाडाझुडपांत काही जण असून, ते त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे मिटकरी यांना जाणवले. यानंतर मिटकरी हे जवळ गेले असता त्यांच्या हातात करवत दिसली. मिटकरी यांना पाहून चोरटे पळाले. मिटकरी यांनी पाठलाग केला; मात्र चोर पळून गेले. मिटकरी यांनी परत येऊन पाहिले तर चोरट्यांनी करवतीचा वापर करून वीस हजार किमतीचे 2 चंदनाची झाडे कापून नेली. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चतुःशृंगी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news