पुणे: नारायणगाव येथे तमाशा फड राहुट्या उभारण्यास सुरुवात

पुणे: नारायणगाव येथे तमाशा फड राहुट्या उभारण्यास सुरुवात
Published on
Updated on

नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा : तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथील राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या दिवंगत विटा भाऊ नारायणगावकर नगरीमध्ये तमाशा फड मालकांच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आज (दि.२५) करण्यात आले. यंदा तमाशाचा राहुट्या नारायणगाव येथील पुणे – नाशिक महामार्गावरील दारूवाला मैदानात उभारल्या जात आहे. आज राहुट्या उभारण्याच्या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला.

नारायणगाव ही तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाते. या तमाशा पंढरीमध्ये ३५ हून अधिक फड मालकांच्या राहुट्या उभारल्या जातात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून गावकरी या तमाशा राहुट्यांमध्ये तमाशाची बारी ठरवायला येत असतात. पाडव्याच्या दिवशी राज्यभरातून लोक तमाशाची बारी ठरवायला येतात व करोडो रुपयांची उलाढाल येथे होत असते.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, संतोष वाजगे, रामदास अभंग, संतोष पाटे, संतोष दांगट, राजाराम पाटे, दादाभाऊ खैरे, विकास तोडकरी, अभय खैरे, आकाश काणसकर, अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, रविकुमार महाजन, स्वप्नील मुंजाळ, रंगनाथ गुळवे, मिथुन लोंढे, निलेश आहिरेकर, किरण कुमार ढवळपुरीकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फड मालकांना माजी आमदार बेनके यांचं मोठं सहकार्य लाभलं याचा आवर्जून उल्लेख फड मालक संभाजी राजे पाटील यांनी केला.तसेच फळ मालकांना नेहमी सहकार्य लाभलेले गणपतराव कोकणे यांचे देखील काही दिवसापूर्वी निधन झाले, त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तमाशा फड मालकांच्या राहुट्या लागतात. मे महिन्याच्य अखेरपर्यंत फड मालकांची कार्यालय नारायणगाव या ठिकाणी असतात. महाराष्ट्रामध्ये सुमारे 136 फड मालकांचे तमाशा आहेत. या सगळ्याच फड मालकांच्या राहुट्या नारायणगाव येथे उभ्या राहतात, असे नाही तर तर साधारण 35 राहूट्या या ठिकाणी लागत असतात. यामध्ये अंजलीराजे नाशिककर, आनंद लोकनाट्य, पांडुरंग मुळे, किरण कुमार ढवळपुरीकर, विठाबाई नारायगावकर, दीपाली सुरेखा पुणेकर, दत्ता महाडीक, निलेश आहिरेकर आदी फड मालकांच्या राहुट्या उभ्या करण्याचे काम सुरु झाले आहे.

या ठिकाणी फड मालकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. व पाणी व वीजजोड मिळवून दिले जाईल, असे यावेळी नारायणगावगावचे उपसरपंचं बाबू पाटे यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news