शिरूरच्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

शिरूरच्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारेगाव येथील शिरूर लोकसभा मतदारसंघ स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी भेट देऊन उपस्थित अधिकार्‍यांना कामकाजाविषयी योग्य त्या सूचना दिल्या.
गुरुवारी (दि. 22) जिल्हाधिकारी डॉ. दिवसे व ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कारेगाव (ता. शिरूर) येथील राज्य वखार महामंडळाचे गोदाम, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव येथे भेट देऊन या गोदामाची पाहणी करून अधिकार्‍यांना कामकाजाविषयी सूचना दिल्या.

या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (ईव्हीएम) रूपाली आवले, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, उपविभागीय अधिकारी हरेश सुळ, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. एम. जाधव व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथील 196 आंबेगाव विधान सभाअंतर्गत मतदान केंद्र क्र. 289, 290 आणि 291 यांना भेट दिली व तेथील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news