ढाब्यावर दारू पिणे ठरणार आता कोर्टाच्या पायरीला आमंत्रण !

ढाब्यावर दारू पिणे ठरणार आता कोर्टाच्या पायरीला आमंत्रण !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये बेकायदा दारू पिण्यासाठी परवानगी देणे हॉटेलचालकाला चांगलेच महागात पडले. न्यायालयाने हॉटेलचालकाला आणि दारू पिणार्‍या दोघांना आर्थिक दंड ठोठावला आहे. ढाबा आणि चायनीज सेंटरवर दारू पिताना सापडल्यास पिणारा आणि पिण्यासाठी बेकायदा परवानगी देणार्‍याला थेट न्यायालयात जावे लागेल, असा इशारा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील महामार्गावर असलेले ढाबे, हॉटेल्स आणि चायनीज, अंड्डाबुर्जी सेंटरवर बेकायदा दारू पिण्यास सेंटरचालक परवानगी देतात. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चर्‍होली-धानोरी रस्त्यावरील हॉटेल आराध्यमध्ये छापा टाकला. या वेळी काही जण बेकायदा दारू घेताना दिसले. त्यानंतर पथकाने हॉटेलचालक देवनाथ गंगाधर गायकवाड (वय 28) याला अटक केली, तसेच दारू पिणारे विजय कंकन विश्वास (वय 22) आणि बिरबल भरत सरकार (वय 29, सर्व रहाणार पठारेमळा, चर्‍होली बु., ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांनाही न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने हॉटेलचालकाला 25 हजार रुपये, तर मद्यपींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. धाबे आणि गर्दीच्या ठिकाणी चायनीज, अंड्डाबुर्जी सेंटरवर बेकायदा दारू पिण्यास चालक परवानगी देत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जिल्ह्यात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले असून, बेकायदा दारू पिण्यास परवनागी दिल्यास गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क एफ विभागाचे (पिंपरी) एस. जे. मोरे, दुय्यन निरीक्षक एम. बी. गडदरे, एस. जी. कोतकर, डी. के. पाटील, जवान आर. आर. गायकवाड, ए. एन. बारंगुळे यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news