औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त | पुढारी

औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त

पुणे / कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ ता.दौंड औद्योगिक क्षेत्रातील अर्थ केम लॅबोरेटरीज कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला असून केलेल्या कारवाईत पुणे पोलिसांकडून 1100 कोटी रुपयांचे तब्बल 600 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन घेतले जात होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात केलेली कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असण्याची शक्यता आहे. यामध्ये काही मोठ्या केलिकल एक्स्पर्टचा सहभाग असून त्यांना बाहेरच्या राज्यातून ताब्यात घेतले आहे.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र केमिकल झोन असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल कंपन्याचे झाळे पसरले आहे. बहुतांश कंपन्यांकडून नियम अटी, शर्यतींना सर्रास पायदळी तुडवले जाते. यात प्रामुख्याने लहान कंपन्याचा समावेश आहे. कंपन्यांत कुठले उत्पादन घेतले जाते. माहिती दिली जात नाही. तसे फलक देखील कंपन्यांसमोर लावले जात नाही. अर्थकेम कंपनी बाबतीत तशीच परिस्थिती असून कंपनीतील उत्पादनाची सखोल माहिती लावलेली नाही. मुळ उत्पादन सोडून कंपनी दुसराच उद्योग सुरू होता. हे अखेर उघड झाले आहे.

यापूर्वी कुरकुंभ एमआयडीतील समर्थ लॅबोरोटरीज आणि सुजलाम केमिकल्स या दोन कंपन्यावर कारवाई करून ड्रग्ज साठा जप्त केला होता. अर्थ केम लॅब्रोटोरीज प्लाॅट नंबर ए 70 या कंपनीत रात्री 3 वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. अहमदनगर जिल्ह्यातील अनिल साबळे नावाच्या व्यक्तीची ही कंपनी असून 15 वर्षापासून ही कंपनी याठिकाणी आहे. कुरकुंभ येथील कारखाना मालक व केमिकल एक्स्पर्ट पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू. अद्याप कोणतीही अटक केलेली नाही. शहरासह देशभरातील विविध शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांची छापेमारी सुरू आहे. अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा

 

Back to top button