नौदलाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर करणार : नौदलप्रमुख आर. हरिकुमार | पुढारी

नौदलाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर करणार : नौदलप्रमुख आर. हरिकुमार

पुणे : भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा मोठा हातभार नौदलाची उत्पादने तयार करण्यात लागत आहे. त्यामुळे नौदलाला आम्ही 2047 पर्यंत आत्मनिर्भर करू शकू, असा निर्धार नौदलप्रमुख आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला. नौदलप्रमुख म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यांनीच खर्‍या अर्थाने देशात नौदलाची स्थापना केली. सागरी आरमार उभारून प्रेरणा दिली. आत्मनिर्भर भारत योजनेत आता शंभर टक्के भारतीय बनावटीचे साहित्य आम्ही नौदलात वापरत आहोत.

यात 55 ते 95 टक्के उत्पादन भारतीय बनावटीचे करण्यात यश मिळाले आहे. नौदलातील शिप प्लो प्रणालीत आम्ही 95 टक्के, मरीन प्रकारात 65 टक्के तर फाइट प्रकारातील यंत्रसामग्रीत 55 टक्के भारतीय बनावटीचे साहित्य वापरले जात आहे. भारतातील सूक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योग ही सर्व सामग्री तयार करून देत आहेत. त्यात मिसाईल लाँचरचाही समावेश आहे.

सिडबी बँकेशी करार

उद्योजकांना कारखाना उभारणे, उत्पादन निर्मितीसाठी सिडबी बँक मदत करत आहे. त्यासाठी बँकेशी करार करण्यात येत आहे. आजवर सुमारे 3 हजार कोटी रुपयांची उत्पादने आत्मनिर्भर भारत योजनेत तयार झाली आहेत. 2047 पर्यंत नौदल शंभर टक्के आत्मनिर्भर होईल, असे नौदलप्रमुख आर. हरिकुमार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button