मुरघासमुळे दुग्धोत्पादनास फायदा : भगवान पासलकर | पुढारी

मुरघासमुळे दुग्धोत्पादनास फायदा : भगवान पासलकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यामध्ये व चारा टंचाईच्या काळात हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध होण्यासाठी उच्च गुणवत्तेचे मुरघास बनविण्यास पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने प्राधान्य दिले असून आहे. ज्यामुळे गुणवत्तापूर्ण दूध निर्मितीस फायदा होईल, असा विश्वास कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली. केंद्र सरकारचा देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीस प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध) आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या (एनडीडीबी) माध्यमातून रांजणगाव सांडस (ता.शिरुर) येथील एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मुरघासचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

ज्याद्वारे सभासद शेतकर्‍यांना मका बियाणाचे रास्त दरामध्ये वाटप करण्यात आले. त्यातून सभासदांच्या 25 एकर शेतजमिनीवर अ‍ॅडव्हान्टा 756 या जातीच्या मका लागवड करण्यात आली होती. एकरी 20 टन मका चार्‍याचे उत्पादन मिळाले आहे. कात्रज दूध संघाचे संचालक निखिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. चारा उत्पादन कामकाजास प्रत्यक्षात सुरुवात झालेली असून थोड्याच दिवसामध्ये तयार होणारा सकस मुरघास रास्त दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी कळविले आहे.

हेही वाचा

Back to top button