भाजप सरकारने देशाचे दिवाळे काढले : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

भाजप सरकारने देशाचे दिवाळे काढले : खा. सुप्रिया सुळे

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा : इलेक्टोरल बॉण्ड सवार्धिक भाजप पक्षाचे आहेत. भाजप सरकारने देशाचे दिवाळे काढण्याचे काम चालविले आहे अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने सेवानिवृत्त पेन्शनधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सुळे बोलत होत्या. या वेळी ईपीएस समितीचे पश्चिम भारताचे कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव चोपडे, तालुकाध्यक्ष प्रतापराव सातपुते, उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, कोषाध्यक्ष भरत कदम, वसंत पैठणकर, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. जगताप, महिला अध्यक्ष वनिता बनकर, कार्याध्यक्ष गौरव जाधव, श्रीकांत पांडुरंग येळे, जयपाल भोसले, बाबाराजे पैठणकर आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, 5 हजार 900 कोटी रुपये इलेक्ट्रोरल बॉण्ड भाजपा पक्षाचे आहेत. ते कोणी दिले, कसे दिले याचा थांगपत्ता नाही. हा भष्टाचार नव्हे तर काय असा सवाल त्यांनी केला. पेटीएम कंपनी माध्यमातून 27 हजार कोटी रुपये बाहेर गेले. ही कंपनी बंद पडण्याच्या मागार्वर आहे. यावर फक्त आपणच आवाज उठविला. माळेगावला इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहे. या बाबत भाजपा सरकारने निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या विचारांचे खासदार का बोलेले नाही असा टोला त्यांनी लगावला. ईपीएस पेन्शनधारकांच्या कष्टाचा पैसा त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तो प्रश्न सोडविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. भाजपा सरकारला याचा जबाब विचारल्या शिवाय राहणार नाही, असे सुळे यांनी सांगितले. प्रास्ताविक अध्यक्ष प्रतापराव सातपुते यांनी केले. भरत कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचलन प्रमोद जाधव यांनी केले.

हेही वाचा

Back to top button