विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत अन‌् साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत! - पुढारी

विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत अन‌् साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साहित्यिक प्रेम वाटतो, जाणिवा विकसित करतो; पण आजच्या साहित्यिकातील लेखक असंवेदनशील झाला असून, ही अराजकतेची सुरुवात आहे. भयामध्ये वावरणारा सामान्य माणूस आणि समाज आतला आवाज गमावून बसला आहे. लोक नको त्याचे समर्थन करू लागल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत. साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत. लेखक आणि कलावंतांची मुस्कटदाबी होत राहिली, तर हा देश पराभूत व्हायला वेळ लागणार नाही, अशा परखड शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी साहित्य क्षेत्रातील स्थितीवर गुरुवारी भाष्य केले.

२९ नोव्हेंबरपासून पासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. कसबे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी डॉ. कसबे यांनी सध्याच्या साहित्यक्षेत्रातील स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत कोणीच कोणाचे ऐकत नाही आणि कोणी इतरांना समजून सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, अशा अराजक स्थितीत देश पोहोचला आहे. देशात जाती आणि वर्ग युद्ध सुरू झाले आहे. साहित्यिक आणि कलावंत भीती आणि संभ्रमात आहेत. देशात वाट्टेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; पण सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. विचारवंतांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे. शेतकर्‍यांना, कामगारांना आपल्या हक्कासाठी सतत रस्त्यावर उतरावे लागत आहे.

विमानतळाची सुरक्षा वाढवणार

भांडवलशाही अर्थव्यवस्थेने निरुपयोगी केलेला सामान्य माणूस समाज आणि देशापासून तुटला आहे. इंद्रधनुष्यासारखा अनेक रंगांचा मिलाफ असलेल्या देशाचे सौंदर्य टिकवले पाहिजे. धर्म, तत्त्वज्ञान आणि प्राचीन परंपरेच्या अहंकाराखाली वैविध्यपूर्ण जीवनशैलीची मोडतोड करण्याऐवजी एकमेकांच्या जीवनशैलीचा आणि खानपान-संस्कृतीचा आदर केला पाहिजे. संस्कृती महान असतानाही केवळ राज्यघटनेमुळे एकसंध राष्ट्र झालेल्या देशाची राज्यघटना आज धोक्यात सापडली आहे, अशी खंतही त्यांनी यावेळीव्यक्त केली.

हेही वाचा

हवाई मालवाहतुक होणार सुसाट

Shakti Mills Gang Rape Case: शक्‍ती मिल सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील तिघा दोषींना जन्‍मठेप

सराईत सोनसाखळी चोरट्यासह चोरीचा माल घेणारा सराफ जेरबंद

आजपासूनच लागा तयारीला ! एक डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार

परमबीर सिंग २३४ दिवसांनी मुंबई पोलिसांसमोर हजर; चौकशी सुरू

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट ; सदाभाऊ खोत आणि पडळकरांची एक्झिट

Back to top button