मराठा आरक्षणासंदर्भात 17 फेब्रुवारीपर्यंत नवा कायदा | पुढारी

मराठा आरक्षणासंदर्भात 17 फेब्रुवारीपर्यंत नवा कायदा

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच माझीही भूमिका आहे. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवा कायदा येणार आहे. या कायद्याला खंबीर पाठिंबा आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे आपले स्वप्न असून, त्यांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचे आहे, असे विधान छगन भुजबळ यांनी पुण्यात रविवारी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे पुण्यात आयोजित युवक मेळाव्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, लोकशाहीत ज्याच्या बाजूने बहुमत आहे, त्याच्या बाजूने निर्णय लागतो. त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हही आपल्याला मिळाले. हे जे चिन्ह आपल्याला मिळाले, त्यात सिंहाचा वाटा माझा आहे, असे
भुजबळ म्हणाले.

शरद पवारांना सल्ला
भुजबळ यांनी शरद पवारांनाही सल्ला दिला. आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी पुनर्विचार करावा. पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवे, असे भुजबळ म्हणाले.

Back to top button