सेक्युलर विचारसरणी आपण सोडलेली नाही : अजित पवार

सेक्युलर विचारसरणी आपण सोडलेली नाही : अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा मिशन मेळावा सुरू असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सेक्युलर विचारसरणी आपण सोडलेली नाही. आता आपण भाजप सोबत का गेलो, हे मी अनेकदा सांगून झालं आहे. मला तेच तेच उकरून काढायचं नाही. आता आपल्याला विकासावर भर द्यायचं आहे. एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं, काळानुरूप बदलायचं असतं. असे अजित पवार म्हणाले.

लाथ मारीन तिथे पाणी काढेल

अजित पवार म्हणाले की युवकांचे हे वय महत्वाचे असते. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे. तसेच ते पुढे बोलताना सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय. त्यामुळं आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्याचं खंडन तातडीनं करा. कोना वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका. फक्त उत्तर देताना कोणाच्या भावना दुखावणार नाही, त्यातून वादंग निर्माण होणार नाही. सहिष्णुतेच्या माध्यमाने आपण उत्तर देऊ शकतो. चुकीचे आरोप करणाऱ्यांना उत्तरं द्या. असं ठणकावून सांगत होते.

अजित पवार हे महायुतीबाबत बोलताना म्हटले की महायुती सरकार नवं युवा धोरण आणणार आहे. या धोरणात नेमकं काय असावं याबाबत तुम्ही काही बाबी सुचवा. तुमच्या ही मतांचा आदर केला जाईल. पूर्वजांचा वारसा अन विचार जपायचा आहे. आपली बदनामी होता कामा नये, याची नोंद घ्यावी. लोकसभा निवडणुका येतायेत. कदाचित महिन्याने आचारसंहिता लागेल.

अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचं आमचं मिशन : धनंजय मुंडे

बालेवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा मिशन मेळाव्यात
धनंजय मुंडे मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की 2 जुलैला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला. त्यानंतर 5 जुलैच्या सभेला खऱ्या अर्थाने लोकशाही दिसली. ती लोकशाही आज ही इथे आहे. 6 फेब्रुवारी ला त्या लोकशाहीचा विजय झाला. पक्ष आणि चिन्ह ही आपलं झाला. आता इथून पुढं फक्त अजित पर्व असणार. पुढची 50 वर्षे ही दादांचीच आहेत.

राहिलेले 'कष्टीवादी'. त्या कष्टीवादी तील भामटे आता काहीही बरळू लागलेत. आता ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी तुम्ही सर्वांनी ठेवा. अजित दादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही. ( शरद पवार गटाला इशारा ) अजित दादांनी आम्हाला उभं केलं, त्यांच्यामुळंच आम्ही आमदार झालो. आत्ता सर्व पक्षाचा विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे दादांनी निवडून आणलेत. असही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news