‘पुणे विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्नशील’

‘पुणे विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्नशील’

पुणे : पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मात्र, यासंदर्भात आत्ता निश्चितपणे सांगता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे विमानतळ संचालक संतोष डोके व संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, मी अनेकदा सांगत असतो, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मला भेटवू नका. पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे एसपी यांना गुंडांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एवढे करूनही कोणत्या गुंडाची मस्ती उतरत नसेल. तर त्याला पोलिसी खाक्या दाखवावा लागेल. पंतप्रधानांच्या हस्ते सातार्‍यातील कार्यक्रम निश्चित आहे. त्याच वेळी आम्ही त्यांच्याच हस्ते पुणे विमानतळ टर्मिनल आणि पुणे मेट्रोच्या उद्घाटनाबाबत प्रयत्न करणार आहे. पवार म्हणाले, विमानाने प्रवास करणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकाला साजेल, अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news