ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतेत | पुढारी

ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक चिंतेत

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील बेट भागात थंडी कमी होऊन गेले दोन दिवसांपासून ढगाळ व धूसर वातावरण तयार होत आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकांवर या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील वर्षी अत्यल्प पावसाच्या पाण्यावर खरिपात पिकांचे यशस्वी उत्पादन घेऊनही अपेक्षित बाजार भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता.रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनातून शेतकरी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच हवामानाचे संकट उभे राहिले आहे.

सध्याच्या प्रतिकूल वातावरणात रब्बी हंगामातील कांदा, तरकारी तसेच जनावरांचे चारा पिकांवर विविध प्रकारच्या किडी, मावा ,तुडतुडे,या रस सोशक कीडींचा पिकांवर प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकर्‍यांना पिकावरती महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे.एकीकडे बाजारात कांद्याला समाधानकारक बाजारभाव नसताना वातावरणातील बदलामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Back to top button