ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत कमल विचारे यांचे निधन | पुढारी

ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत कमल विचारे यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या कमलताई विचारे (वय 95) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या सत्यशोधक विचारवंत केशवराव विचारे यांच्या स्नुषा होतं. गेल्या वर्षभरापासून त्या वाकड येथील तपस ओल्ड एज केअर येथे वास्तव्यास होत्या, येथेच त्यांचे निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विचारे यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले.

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार मंडळाच्या सदस्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सिनेट सदस्य, महाराष्ट्र सामाजिक समता परिषदेच्या चिटणीस, ठाणे जिल्हा कृषी – औद्योगिक प्रतिष्ठानच्या चिटणीस अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सरकारच्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या अनेक उपक्रमात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1960 पासून त्या काँग्रेसच्या क्रियाशील सदस्य होत्या. अखिल भारतीय काँग्रेस महिला फ्रंटच्या विविध विभागात त्यांनी काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना सन्मानित केले होते. त्यांनी महिलांसाठी संसारशास्र अभ्यासक्रम बनवला होता. ज्याला सरकारने मान्यता देऊन महिला विकास शाळा काढल्या. गृहिणी नावाचे उपयुक्त पुस्तकही त्यांनी लिहिले. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक संस्था – संघटनांना आर्थिक मदत केली.

हेही वाचा

Back to top button