पुणे विमानतळ लवकरच 24 तास | पुढारी

पुणे विमानतळ लवकरच 24 तास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी सध्या पुणे विमानतळावरून फक्त 12 तासच विमानांची वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक आता 1 डिसेंबरपासून 24 तास सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रात्रीही पुण्यातून बाहेर आणि बाहेरून पुण्यात ये-जा करता येणार आहे.

ParamBir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

सध्या 12 तासांत पुणे विमानतळावरून 60 ते 62 विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे 17 ते 18 हजार प्रवासी ये-जा करतात. आता 1 डिसेंबरपासून यामध्ये वाढ होणार असून, 24 तासांत 80 ते 90 च्या घरात पुणे विमानतळावरून विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच पुण्यातून विमानांची वाहतूक सुरू राहणार आहे.

TMC : मेघालयमध्‍ये काॅंग्रेसला भगदाड ! १२ आमदारांनी केला तृणमूलमध्ये प्रवेश

बाहेरून येणार्‍यांचीआरटीपीसीआर बंद?

सध्या पुणे विमानतळावरून जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, प्रवासी जाताना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र घेऊन जात आहेत. तरीही प्रशासनाकडून त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना कारण नसताना खर्च करावा लागत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे संचालक ढोके यांनी सांगितले. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांचे अंतर असावे, अन्यथा आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Shakti Mills Gang Rape Case: शक्‍तीमिल सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील तिघा दोषींना जन्‍मठेप

‘‘येत्या 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळावरून विमानांची वाहतूक 24 तास सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील सर्व नियोजन आम्ही केले आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामामुळे सध्या 12 तास म्हणजे सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत विमानांची वाहतूक सुरू आहे. 1 तारखेनंतर 24 तास सुरू होईल.’’

                                                                                                                            – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Back to top button