क्राईम ब्रँचचा फंडा अन् पाच लाखांचा गंडा; पोलिस ऑफिसर असल्याचा बनाव

fraud
fraud

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मी मुंबई क्राईम ब्रँचमधून पोलिस ऑफिसर अजयकुमार गुप्ता बोलतोय… तुमच्या नावाने मुंबईतून थायलंडला एक पार्सल पाठविले असून, त्यामध्ये अमली पदार्थ आहेत. तुम्ही सर्व केस क्लिअर करून एनओसी घ्या, अन्यथा तुम्हाला अटक होईल, अशी भीती दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 4 लाख 90 हजार 400 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे.
याप्रकरणी, मगरपट्टा हडपसरमधील 47 वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींना फेडेक्स कंपनी मुंबई तसेच क्राईम ब्रँच ऑफिसर अजयकुमार गुप्ता बोलतोय, असे फोन करून सांगितले. फिर्यादींनी तुमच्या नावाने मुंबई येथून थायलंडला पार्सल लाठविले असून, त्यामध्ये अमली पदार्थ आहेत. फिर्यादींना अटक करण्याची भीती दाखवून सर्व केस क्लिअर करण्यासाठी एनओसी घ्यावी लागेल. अन्यथा, तुम्हाला अटक करावी लागेल, असे धमकावले. त्यानंतर फिर्यादींच्या बँक खात्याची माहिती घेऊन 4 लाख 90 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक डगळे करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news