पुणे : सासवड तहसीलमधून ईव्हीएमचे सिम चोरी ; दोघे ताब्यात

पुणे : सासवड तहसीलमधून ईव्हीएमचे सिम चोरी ; दोघे ताब्यात

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील पोलिस गार्डशेजारील स्ट्राँग रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून एक ईव्हीएम डेमो मशिनचे सिम चोरीला गेले. ही बाब लक्षात येताच महसूल, पोलिस आणि निवडणूक शाखा प्रशासनाला खडबडून जाग आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या पथकाने भेट देऊन एकत्रित पाहणी केली. दरम्यान, कामात हलगर्जीपणा केल्याने दोघांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखेकडून जनजागृतीसाठी काही ईव्हीएम मशिन प्राप्त झाल्या होत्या. पोलिस कोठडीशेजारी स्ट्राँग रूममध्ये एकूण 40 मशिन ठेवण्यात आल्या होत्या.

शनिवारी मध्यरात्र ते रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या आवारात प्रवेश करून लॉकरचे कुलूप तोडून एका ईव्हीएम मशिनचे सिम चोरून नेल्याचे सोमवारी कामकाजाच्या दिवशी लक्षात आले. त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आवश्यक त्या माहितीचे धागेदोरे पोलिसांकडे उपलब्ध झाल्याचे पोलिस अधीक्षक (ग्रामीण) पंकज देशमुख यांनी माहिती देताना सांगितले. यासाठी पाच पथके रवाना करण्यात आले आहेत, तसेच या प्रकरणाचा काही दिवसांतच पूर्ण छडा लागून गेलेला महत्त्वाचा मुद्देमाल हाती येईल, असा विश्वास व्यक्त केला.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी आयोगाच्या आदेशाने सुरू असून, याचे डेमो प्रशिक्षण देण्याचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू होत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. शनिवारी रात्री ड्युटीवर असलेले सहायक फौजदार डी. एल. माने व होमगार्ड राहुल जरांडे हे दोघेही गैरहजर होते, हे निष्पन्न झाल्याने व सेवाकामात हलगर्जीपणा दाखविल्याने सहायक फौजदार माने व होमगार्ड जरांडे यांना तातडीने निलंबित करीत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

मशीन चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे तहसीलदार कार्यालयात सोमवारी ईव्हीएम मशीन चोरीचा प्रकार समोर आला होता आणि यानंतर आता पोलिसांनी माळशिरस येथून दोन जणांना ताब्यात घेतलय ..या दोघांकडून पोलिसांनी मशीन हस्तगत केलीय, आणखी एक आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत ..या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहे का याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे… पोलीस प्रशासनाकडून अद्याप याबाबतची माहिती दिली जात नाही मात्र या संदर्भात सुरू असलेल्या कारवाईला पोलीस प्रशासनाकडून पुष्टी मिळते आहे…आणखी आरोपी पकडायचे असल्याने पोलिसांनी पकडलेल्या आरोपींचे नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news