Trends Strory : कमी खर्चातील ‘क्लाऊड किचन’ची चलती! | पुढारी

Trends Strory : कमी खर्चातील ‘क्लाऊड किचन’ची चलती!

सुवर्णा चव्हाण

पुणे : मोठ्या प्रशस्त जागेत हॉटेल अन् रेस्टॉरंटची संकल्पना आपण ऐकलीच असेल… पण, आता पुण्यात क्लाऊड किचनचा ट्रेंड रुजत आहे. कमी जागेत किंवा छोट्या खोलीत वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून त्याची ऑनलाइन विक्री करणार्‍या क्लाऊड किचनची संख्या वाढत आहे. कमी पैश्यात सुरू झालेल्या साडेसातशेवर मध्यवर्ती स्वयंपाकघर व्यवसायात 20 ते 35 वयोगटांतील सुमारे साडेतीन हजार तरुण कार्यरत आहेत.
हिंजवडी, बाणेर, औंध, शिवाजीनगर, विमाननगर, कोथरूड या गर्दीच्या ठिकाणी क्लाऊड किचन आहेत. इथे महाराष्ट्रीय थालीपासून ते इटालियन डीशपर्यंत… गुजराती पदार्थांपासून ते जपानी खाद्यपदार्थांपर्यंत… असे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करून त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे. अनेकांनी स्टार्टअप म्हणून हा व्यवसाय सुरू केला आहे. अगदी काहींनी घरांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे.
पुणे रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, छोट्याशा जागेतील हे  किचन एकप्रकारचे स्वयंपाकघरच असते.
क्लाऊड किचनसाठीचा उद्योग परवाना लागतो. अनेक गुंतवणूकदार किंवा जागा मालक त्यांच्या जागेत एका छताखाली अनेक क्लाऊड किचन निर्माण करून चालवायला देत आहेत. विविध स्थानिक किंवा देशी व आंतरदेशीय ब्रॅंड्ससाठी येथे त्यांच्या कंपनीच्या खास पदार्थांचे उत्पादन केले जाते व ऑनलाईन पद्धतीने ते खवय्यांपर्यंत पोहोचविले जाते. असे क्लाऊड किचन दिवसरात्र चालू असतात. त्यामुळे खवय्यांना सुद्धा घरबसल्या हव्या त्या ब्रॅंड्सचे खाद्यपदार्थ उपलब्ध होतात.

काय आहे संकल्पना?

क्लाऊड किचन एक प्रकारचे छोटे स्वयंपाकघर असते. या किचनमध्ये हॉटेलमध्ये बसून ऑर्डर देता किंवा जेवता येते, तशी ऑर्डर येथे देता येत नाही. खवय्यांना दूरध्वनी, अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यावी लागते. सध्या क्लाऊड किचनच्या माध्यमातून तरुणांनी व्यवसाय  सुरू केला आहे. त्याला खवय्यांमधूनही  तसा प्रतिसाद मिळत आहे.

का वाढतोय ट्रेंड?

  • गुंतवणूक, कर्मचारी संख्या कमी
  • तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय
  • घरपोच सेवा देणे सोयीचे
महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची विक्री करत असून, त्याला चांगला प्रतिसाद आहे. ही संकल्पना नवीन असली तरी मी दहा वर्षांपूर्वीच क्लाऊड किचन सुरू केले. कमी जागा आणि कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. त्यामुळे या व्यवसायात अनेक तरुण काम करत आहेत.
– ओमकार द्रविड, व्यावसायिक

हेही वाचा

 

Back to top button