राजुरी गावठाणात बिबट्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

राजुरी गावठाणात बिबट्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बेल्हे : राजुरी (ता. जुन्नर) येथील शेतशिवारात नेहमीच संचार करणारे बिबटे आता गावठाण परिसरात फिरू लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घरासमोर व घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.

राजुरी, उंच खडक या गावांमधील फावडेमळा, गुरवशेत, पानसरेमळा, आबाटेक, डुंबरेमळा, आवटेमळा, गोंधळमळा, गोगडीमळा, आडेवाहाळ, सुहासनगर, सुयोगनगर, उपळीमळा, लाडूहरी मळा या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा संचार आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन व पाळीव प्राणी ठार होत असल्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news