Vegetable Market : पालेभाज्या आवाक्यात; लसूण तेजीत | पुढारी

Vegetable Market : पालेभाज्या आवाक्यात; लसूण तेजीत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोशी उपबाजार आणि शहरातील भाजी मंडईममध्ये पालेभाज्यांचे दर आवाक्यात आले आहेत; मात्र दोडका, शिमला, राजमा या फळभाज्यांचे दर तुलनेत जास्त आहेत. लसूणाचे दर वाढल्याने पदार्थांना फोडणी देणेही गृहिणींना परवडेनासे झाले आहे. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी, तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात मेथी, पालक, चवळी, चुका, कोथिंबीर, प्रत्येकी सरासरी 10 ते 15 रुपये प्रति जुडी दराने विकली जात आहे. दोडका, पडवळ, शिमला, बीन्स, कारली 50 ते 60 प्रति किलो भावाने विकले जात आहे. मात्र लसणाचे दर अजूनही 360 ते 400 रुपये प्रति किलोने मिळत आहे. भेंडी 50 ते 60 रुपये किलो असून, मिरची 40 ते 50; तिखट मिरची 80 ते 90 रुपये किलो दराने विकली जात असल्याची माहिती भाजी व्रिकीत्यांनी दिली आहे.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो )

गाजर – 30 ते 40 , वांगी 20 ते 25 , शेवगा 100 ते 110 भेंडी 50 ते 60 गवार 80 ते 90, फ्लॉवर – 30, काळा राजमा 50, काकडी 30 ते 40, कांदा- 20, बटाटा -20, आले 90 ते 100, टोमॅटो 40 ते 50, मटार 50 लसूण 360.

मोशी उपबाजार आवक (क्विंटल)

कांदा- 705 , बटाटा – 773 , आले- 31 गाजर – 123, गवार – 5 हिरवी मिरची- 150, टोमॅटो- 512, काकडी- 206 , भेंडी- 91, मोशी उपबाजारात पालेभाज्याची एकूण आवक 61 हजार 700 आणि फळांची आवक – 336 क्विंटल आणि फळ भांज्याची आवक 3 हजार 978 क्विंटल इतकी झाली आहे.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव

पालेभाज्या : दर प्रति जुडी

  • मेथी -10 ते 20
  • कोथिंबीर- 10 ते 20
  • कांदापात – 15 ते 20
  • शेपू – 10 ते 15
  • पुदीना – 10
  • मुळा 15 ते 20
  • चुका – 10 ते 15
  • पालक – 10 ते 15
  • चवळी – 10 ते 15
  • फळभाज्यांचे ः किलोचे भाव
  • कांदा जुना – 30 ते 40
  • बटाटा – 20
  • आले- 90 ते 10
  • लसूण – 360
  • भेंडी – 50 ते 60
  • मटार – 50
  • फ्लॉवर – 30
  • कोबी – 20
  • काकडी -30 ते 40
  • हिरवी मिरची – 40 ते 50
  • काळा राजमा – 50 रुपये
  • घोसावळे – 80
  • भरताची वांगी – 20 ते 30
  • शिमला – 60
  • दोडका – 70 ते80
  • शेवगा – 100 ते 110
  • कारले – 50
  • पडवळ – 80
  • घेवडा – 40
  • दुधी भोपळा – 40
  • गाजर – 30

हेही वाचा

Back to top button