Pimpri : प्राधिकरणातील हेगडेवार भवनाशेजारीही अग्निशमन केंद्र

Pimpri : प्राधिकरणातील हेगडेवार भवनाशेजारीही अग्निशमन केंद्र

पिंपरी : महापालिकेच्या वतीने रावेत पाठोपाठ प्राधिकरण, निगडी येथील हेडगेवार भवनाजवळील अग्निशनम केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आगीसारखी दुर्घटना घडल्यास तत्काळ अग्निशमन जवानाची मदत मिळणे सुलभ व
वेगवान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती वाढून नागरीकरण वाढले आहे. तसेच, शहरात औद्योगिक कंपन्या व लघुउद्योग मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आगीसारख्या घटना वारंवार घडत आहेत.

शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन पालिकेने ज्या भागात अग्निशमन केंद्र नाही, त्या भागात तातडीने केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार रावेतनंतर आता प्राधिकरणात केंद्र बांधले जाणार आहे. हेडगेवार भवनाशेजारील मोकळ्या जागेत हे केंद्र बांधले जाणार आहे. त्या कामासाठी निविदापूर्व व निविदापश्चात काम करण्यासाठी पालिकेने सल्लागार नेमला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल. या केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरात आगीच्या घटना किंवा इतर आप्तकालीन घटना घडल्यास पालिकेच्या अग्निशमन जवानांची तातडीने मदत मिळू शकेल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news