अजित पवारांच्या घरासमोर ओबीसींचे आंदोलन | पुढारी

अजित पवारांच्या घरासमोर ओबीसींचे आंदोलन

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानासमोर ओबीसी समाजाने गुरुवारी (दि. 1) आंदोलन केले. या वेळी अ‍ॅड. प्रियदर्शनी कोकरे, अनिल लडकत, गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर कौले, जी. बी. गावडे, अमोल सातकर, राजेंद्र बरकडे, रोहित बनकर, नीलेश टिळेकर, सचिन शाहीर, वनिता बनकर, देवेंद्र बनकर, रमेश कोकरे, नवनाथ अपुणे आदींची भाषणे झाली. अ‍ॅड. प्रियदर्शनी कोकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. शिंदे-पवार-फडणवीस सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला. सन 2024 ला तुम्हाला घरी बसवू असा इशारा त्यांनी दिला. शिंदे समिती तत्काळ रद्द करा, कुणबी प्रमाणपत्र तत्काळ रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगे-सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी
प्रमाणपत्र देण्यासाठी मसुदा काढला आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

Back to top button