पुणे जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल | पुढारी

पुणे जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलात बुधवारी (दि. 31) रात्री उशिरा मोठे फेरबदल झाले. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती झाली. बारामतीच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संजय जाधव यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख घेतील. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे व मितेश घट्टे या दोघांचीही बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. बारामतीच्या अपर पोलिस अधीक्षकपदी नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे नियंत्रक संजय जाधव यांची नियुक्ती झाली आहे. पुण्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी चाळीसगावचे अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांची बदली झाली आहे.

पोलिस निरीक्षकांच्या बदल्या (कोठून कुठे)
– भाऊसाहेब पोपट सांडभोर – (जेजुरी ते आर्थिक गुन्हे शाखा), भाऊसाहेब नारायण पाटील (दौंड ते जिल्हा वाहतूक शाखा), बळवंत कुंडलिक मांडगे (मंचर ते नियंत्रण कक्ष), हेमंत गणपत शेडगे (यवत ते आर्थिक गुन्हे शाखा), प्रमोद अंबादास क्षीरसागर (शिक्रापूर ते सुरक्षा शाखा).

नियंत्रण कक्षातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
अरुण ज्ञानदेव फुगे (मंचर), दिपरतन गोरख गायकवाड (शिक्रापूर), महादेव नारायण वाघमोडे (रांजणगाव), जोतिराम माणिक गुंजवटे (शिरुर), नारायण शिवाजी देशमुख (यवत), चंद्रशेखर मोहनराव यादव (दौंड), गोरख कृष्णा गायकवाड (बारामती तालुका), नवनाथ कोंडिबा मदने (पोलिस कल्याण शाखा).

सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षकांच्या बदल्या (कोठून कुठे)
लहू गौतम थाटे (शिक्रापूर ते ओतूर), नेताजी शहाजी गंधारे (स्थानिक गुन्हे शाखा ते पारगाव), दीपक भाऊसाहेब वाकचौरे (अर्ज शाखा ते जेजुरी), संदेश चंद्रकांत बावकर (यवत ते भिगवण), नितीन हनुमंत खामगळ (राजगड ते वेल्हा), उपनरीक्षक पुंडलिक मारुती गावडे (जेजुरी ते इंदापूर), उपनिरीक्षक प्रियंका दशरथ माने (सासवड ते अर्ज शाखा).

नियंत्रण कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या
सहायक पोलिस निरीक्षक : राजकुमार काशिनाथ डुणगे (वालचंदनगर), संदीप लक्ष्मण साळुंखे (शिक्रापूर), प्रवीण महादेव संपागे (यवत), विवेकानंद दत्तात्रय राळेभात (इंदापूर), उपनिरीक्षक नामदेव लक्ष्मण तारडे
(जेजुरी), उपनिरीक्षक दिपाली बळवंत पाटील (लोणावळा शहर)फफ

विनंती बदल्या झालेले पोलिस निरीक्षक (कोठून कुठे)
सतीश भाऊसाहेब होडगर (आर्थिक गुन्हे शाखा ते आळेफाटा), किरण नामदेव अवचर (माळेगाव ते जुन्नर), सुहास लक्ष्मण जगताप (जिल्हा वाहतूक शाखा ते लोणावळा शहर), राजेश गणेश गवळी (पोलिस कल्याण शाखा ते राजगड), प्रभाकर माधवराव मोरे (बारामती
तालुका ते परकीय नागरिक नोंदणी कक्ष), सीताराम लक्ष्मण डुबल (लोणावळा
शहर ते नियंत्रण कक्ष – दोन वर्षे पूर्ण झाल्याने).

Back to top button