महत्त्वाची बातमी ! आळंदीत आठवडाभरासाठी वाहतुकीत बदल | पुढारी

महत्त्वाची बातमी ! आळंदीत आठवडाभरासाठी वाहतुकीत बदल

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या जन्मोत्सवानिमित्त आळंदीत पार पडत असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त येणार्‍या भाविकांचा विचार करता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागातर्फे आळंदीतील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार (दि. 4) ते रविवार (दि. 11) असा आठवडाभर वाहतुकीत बदल राहणार आहे. असे असेल बंद रस्ते व पर्यायी मार्ग
इंद्रायणी घाट ते चाकण चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद.

पर्यायी मार्ग- इंद्रायणी नगर कमान काटे पाटील चौक नवीन पुल मार्गे इच्छित स्थळी जातील.
इंद्रायणीनगर कमान ते फाटेपाटील चौक एकेरी वाहतूक सुरू राहील.

काटे पाटील चौक ते इंद्रायणी घाट मेन रोड सर्व वाहनांना प्रवेश बंद.
पर्याची मार्ग : काटे पाटील चौक नवीन पुल मार्गे इच्छितस्थळी जातील.

घुंडरे पाटील चौक ते बापदेव चौक सर्व वाहनांना बंदी राहील.
पर्यायी मार्ग- 1. इंद्रायणी हॉस्पीटल मागे 2. गोपाळपुरा मार्ग 3. चाकण चौक मागे इच्छितस्थळी जातील.

चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड- अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग -1. भारतमाता चौक हवालदार वस्ती देहूफाटा चौक चर्‍होली फाटा चौक मार्ग इच्छितस्थळी जातील. जयगणेश साम—ाज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड- अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग 1. भारतमाता चौक- हवालदार वस्ती देहूफाटा चौक चर्‍होली फाटा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. जयगणेश साम—ाज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

माझगाव फाटा चौक येथून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग 1. भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

देहूफाटा चौकाकडून आळंदीकडे येणारे जड-अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग 1. हवालदार वस्ती मार्गे इच्छितस्थळी जातील.2. चहोली फाटामार्गे इच्छितस्थळी जातील.

चाकण शिक्रापूर रोड, रसिका हॉटेल येथून आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांसाठी बंदी राहील.
पर्यायी मार्ग-
1. शिक्रापूर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. 2. चाकण-मोशी मार्गे इच्छित स्थळी जातील. 3. कोयाळी-मरकळमार्गे इच्छितस्थळी जातील.
आळंदी शहरामधे कार्यक्रमाचे अनुषंगाने चाकण चौक ते इंद्रायणी हॉस्पिटलपर्यंत तात्पुरते स्वरुपात वाहने पार्किंग थांबवण्यास मनाई करण्यात येत आहे.

Back to top button