हेल्मेट न घालणार्‍यांवर पुराव्यासहित कारवाई : पोलिस आयुक्त अमितेश कुमार | पुढारी

हेल्मेट न घालणार्‍यांवर पुराव्यासहित कारवाई : पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नागरिकांमध्ये हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आमची प्राथमिकता राहणार आहे. हेल्मेट न घालणार्यावर पुराव्यासह कारर्वाइ केली जाइर्ल असा इशारा पुणे पोलिस आयुक्ताचा पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिला. तत्पूर्वी त्यांनी मावळते पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पोलिसिंग, कायदा सुव्यवस्था वाहतूक नियंत्रण, महिलांची सुरक्षा, सायबर क्राईम अशा सर्वावर आमचे लक्ष व प्राथमिकता असणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण तसेच त्यांच्या बरोबर सकारात्मक संवाद ठेवण्याची आमची प्राथमिकता राहील. गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, अंमली पदार्थाचे हॉटस्पॉट आहेत त्याच्याकडे आमचे लक्ष राहील. व्हिजीबल पोलिसींग कसे वाढवता येईल याच्यावर माझा भर असेल. अतिरेकी कारवाया होऊ नये यासाठी आमचे प्राधान्य असेल. सामान्य जनतेला सोबत घेऊन आमचा काम करण्याचा मानस राहील असेही आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

क्राईम नियंत्रणाच्या द़ृष्टीने कोयत्याचा वापर होत असेल त्यांच्यावर परिणामकारक कारवाई केली जाईल. त्याबरोबर शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील टॉप 20 गुन्हेगारांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाईल. वाहतूक सुरळीत राहवी हा आमचा दृष्टिकोन राहणार आहे. कॅमेरा आधारीत वाहतूक नियत्रंणावरही आमचा भर असेल. हेल्मेट घालणे हे अनिवार्य असल्याने नागरिकांनीही स्वतःहून हेल्मेट परिधान केले पाहिजे यासाठी आम्ही जनजागृती करू, त्यानंतर कारवाईला प्राधान्य दिले जाईल. उलट्या बाजूने वाहन चालविणे, बेल्ट न लावणे अशांवरही कारवाई होईल असेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button