त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागांनी निविदा काढण्याचा धडका लावला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसापासुन पालिकेच्या टेंडर सेल विभागात निविदाची लगीन घाई सुरू आहे. मागील दोन दिवसात म्हणजे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी विविध कामांच्या जवळपास 100 कोटीच्या 121 निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या या निविदा 'मार्चएंड'च्या पूर्वी केवळ निधी संपवण्यासाठी वाटेल त्या कामाच्या काढल्या जात आहेत. मोठ्या निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी जावू नयेत, म्हणून त्या तुकड्या तुकड्यात काढण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.