Accident News : पिकअप-दुचाकी धडकेत दोघे जखमी | पुढारी

Accident News : पिकअप-दुचाकी धडकेत दोघे जखमी

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  मंचर-पारगाव कारखाना रस्त्यावरील अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील हिंगे वस्तीजवळ घरगुती गॅस वाहतूक करणारी पिकअप गाडी व मोटरसायकल यांचा अपघात झाला. यामध्ये मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले. पिकअप गाडी व मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवारी (दि. 31) रोजी दुपारी तीन वाजता घडला. गॅस वाहतूक करणारी पिकअप (एमएच 14 केए 1930) ही कळंब येथून भरलेले सिलिंडर घेऊन लोणी धामणीकडे चालली होती. यावेळी प्रकाश रामदास दिघे आणि सुनील लक्ष्मण दाते (दोघेही रा. काठापूर) हे मोटरसायकलने (एमएच 12 केएच 446) गावी चालले होते.

अवसरी बुद्रुक हिंगे वस्तीजवळ पिकअप गाडी आली असताना या दोन्ही गाड्यांमध्ये अपघात होऊन पिकअप गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात मोटरसायकलवरील दोघेजण जखमी झाले असून, दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. पिकअप गाडीतील चालक व क्लीनर हे गाडीच्या काच फुटून पुढच्या बाजूने बाहेर पडल्याने तेदेखील किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button