Pimpari : प्रवासी महिलेचा विनयभंग; बसचालक, वाहक गजाआड

Pimpari : प्रवासी महिलेचा विनयभंग; बसचालक, वाहक गजाआड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तिकिटाच्या सुट्या पैशांवरून प्रवासी महिला आणि पीएमपीएमएल बसचालक, वाहकामध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, चालक आणि वाहकाने इतर प्रवाशांना उतरवून संबंधित महिलेला डेपोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महिलेने नातेवाइकांना फोन करून स्वत:ची सुटका करून घेतली. ही घटना रविवारी (दि. 28) तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडली.
याप्रकरणी बसचालक आणि वाहक या दोघांना अटक करण्यात आली आहे. बसचालक नवनाथ व्यंकटराव ढगे (28, रा. मोईगाव), वाहनचालक मुजा गणपती लुट्टे (30, रा. रूपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने तळेगाव – दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या तळेगाव स्टेशनपासून निगडीकडे जाणार्‍या बसमध्ये चढल्या. दरम्यान, तिकिटावरून प्रवासी महिला आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर चालकाने महिलेची मोबाईलमध्ये शूटिंग केली. याबाबत जाब विचारत महिला त्यांच्या अंगावर धावून गेली आणि त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपीने महिलेचा विनयभंग केला. तसेच, चालक व वाहक या दोघांनी बसमधील इतर प्रवाशांना सोडून फिर्यादी यांना डेपोकडे नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने नातेवाइकांना फोन करून बोलावून घेतले. रस्त्यात महिलेच्या नातेवाइकांनी बस अडवून महिलेची सुटका केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news