विद्यापीठांतही निवडणूक साक्षरता अभ्यासक्रम | पुढारी

विद्यापीठांतही निवडणूक साक्षरता अभ्यासक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : द्यावेत. स्थानिक निवडणूक अधिकार्‍यांच्या सहकार्याने ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यांचे प्रात्यक्षिके आणि निवडणूक साक्षरतेबाबत स्पर्धा आयोजित कराव्यात, असे निर्देश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे विद्यापीठांना दिले आहेत.

केंद्रीय निवडणक आयोग व केंद्रीय शिक्षण मंत्रालयामध्ये सामाजिक करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय यांच्या स्तरावर निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज भरून मतदान ओळखपत्र देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

निवडणूक साक्षरतेच्या अनुषंगाने अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करावे. यु-डायस आणि अन्य डेटाबेस च्या सहाय्याने महाविद्यालयातील 17 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन 18 वर्षे पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरून मतदान ओळख पत्र देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.

भावी मतदारांमध्ये प्रत्येक निवडणुकीत उत्कट माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने भाग घेण्याची इच्छा निर्माण करावी. विद्यार्थ्यांमध्ये मतदार जागृती करण्यासाठी इतर सह अभ्यासात्मक उपक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब निर्माण करावेत.
नैतिक मतदानाच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आणि विद्यार्थी संघटनास्तरावर मुक्त निष्पक्ष आणि प्रलोभनमुक्त नैतिक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी महाविद्यालय विद्यापीठामध्ये जेथे विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेतल्या जातात. तेथे निवडणूक साक्षरता जागरूकता कार्यक्रम सुरू करावेत, असेही या अध्यादेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेशात काय म्हटलेय…

  • भावी मतदारांना देशाच्या निवडणूक यंत्रणेबद्दल पूर्णपणे परिचित करून द्यावे.
  • महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब निर्माण करावेत.
  • कंटिन्यूअस इलेक्ट्रॉल अँड्रॉसी एज्युकेशनमध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी क्रेडिट सिस्टीम तयार करावी.
  • जेथे विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेतल्या जातात तेथे निवडणूक साक्षरता जागरूकता कार्यक्रम
  • सुरू करावेत.

Back to top button