Pune : वरकुटे खुर्द येथील पीरसाहेब यात्रा सुरू | पुढारी

Pune : वरकुटे खुर्द येथील पीरसाहेब यात्रा सुरू

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्दसह पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत मलिक साहेब ऊर्फ पीरसाहेब यात्रेला (उरूस) बुधवार (दि. 24)पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत संदलचा (चंदन उटी) पारंपरिक पध्दतीने कार्यक्रम पार पडला. यामध्ये युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. ही यात्रा तीन दिवस मोठ्या उत्साहात भरणार असून, यात्रा कमिटीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती श्री पीरसाहेब यात्रा (उरूस) कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप लक्ष्मण शेंडे यांनी दिली. गुरुवारी (दि. 25) सायंकाळी सात वाजता पीरसाहेबांच्या यात्रेचा मोठ्या उत्साहात छबिना निघणार आहे. रात्री 9 वाजता शोभेचे दारूकाम होणार आहे.

याच दिवशी रात्री धुमाकूळ हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 26) लाल मातीतील मर्दानी खेळ अशी ओळख असणार्‍या कुस्त्यांच्या जंगी मैदानाला दुपारी दोन वाजेपासून गावातील मारुती महादेव मंदिराजवळील कुस्ती आखाड्यात सुरुवात होणार आहे. यात प्रथम क्रमाकांची 1 लाख 11 हजारांची प्रेक्षणीय निकाली कुस्ती ही महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख, अशी लढत होणार आहे. तसेच वरकुटे खुर्दचा महेश पवार विरुद्ध कोल्हापूरचा राहुल काळे, दादा जाधव विरुद्ध साहिल कदम, संतोष जगताप विरुद्ध संग्राम पाटील, दादा मुलाणी विरुद्ध विकास धोत्रे, तेजस शिंदे विरुद्ध गौरव कसबे, अविनाश गावडे विरुद्ध अजय राजमाने, बापू सलगर विरुद्ध कृष्ण हरणावळ, मनीष रायते विरुद्ध विक्रम घोरपडे, सनी राऊत विरुद्ध
चैतन दुर्गुडे, जमीर मुलाणी विरुद्ध विजय मांडवे, अमित शेंडे विरुद्ध विजय चोरगे, स्वप्निल दगडे विरुद्ध अतुल पवार, सत्यजित मोरे विरुद्ध विशाल घाडगे, निखिल मोरे विरुद्ध सुजित हजारे या कुस्त्यांसह 200 हून अधिक निकाली कुस्त्या होणार आहेत.

Back to top button