Pune : जेजुरीत गाढवांचा बाजार सुरू | पुढारी

Pune : जेजुरीत गाढवांचा बाजार सुरू

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : जेजुरी येथील खंडोबा देवाच्या पौष पैर्णिमेनिमित्त येथे गाढवांचा बाजार भरला आहे. अठरा- पगड जाती जमातीतील महाराष्ट्र, आंध— प्रदेश कर्नाटक आदी राज्यांतून समाजबांधव या यात्रेसाठी सहभागी झाले आहेत. मात्र, सध्याच्या आधुनिक युगामध्ये येथील गाढवांच्या बाजाराला उतरती कळा सुरू झाली आहे. जेजुरीच्या बंगाली पटांगणात मंगळवार (दि.23) पासून या बाजारात गाढवांची खरेदी- विक्री सुरू झाली. एका गाढवाला दहा हजार रुपयांपासून ते सत्तर हजार रुपयांपर्यंत किमंत मिळत आहे.

गाढवावर उदरनिर्वाह अवलंबून असणार्‍या समाजातील लोक गाढवांच्या खरेदी- विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी प्रत्येक पौष पौर्णिमेला जेजुरीत येतात. गाढवांच्या बाजारानंतर वैदू समाजाचा कुस्तीचा आखाडा दरवर्षी भरतो.
सध्याच्या यंत्रयुगात मोटारी, टेम्पो आदी वाहने आल्याने गाढवांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. असे असले तरी गाढवांची किंमत
टिकून आहे.

सौराष्ट्रातून दोनशे गाढवं दाखल
दोन ते तीन दिवस चालणार्‍या या बाजारासाठी सौराष्ट्रातून सुमारे दोनशे गाढवं विक्रीसाठी दाखल झाली आहेत. तसेच कर्नाटक, आंध— प्रदेश व महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, धाराशिव, सातारा आदी विविध भागातून सुमारे एक हजार गाढवं दाखल झाली आहेत. दरवर्षीच्या बाजारात गाढवांची संख्या कमी होत असल्याने या बाजाराला उतरती कळा सुरू झाली आहे.

 

Back to top button