Pune : शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख मतदार | पुढारी

Pune : शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख मतदार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये 30 लाख 86 हजार 711 मतदार हे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदार संख्येत हडपसर मतदार संघात सर्वांधिक मतदार असून नेहमीप्रमाणे सर्वात कमी मतदार संख्या पुणे कँन्टोन्मेंट मतदार संघात आहे. कसब्यामध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त असल्याने या मतदार संघाचा निकाल महिलांच्या हाती असणार आहे. सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या हडपसरमध्ये मतदारांची संख्या पाच लाख 62 हजार 186 झाली आहे. मतदार संख्येत खडकवासला मतदारसंघ असून, या ठिकाणी पाच लाख 21 हजार 209 मतदार झाले आहेत.

वडगाव शेरी तिसर्‍या क्रमांकावर असून, येथे चार लाख 52 हजार 628, कोथरूड विधानसभा मतदार संघ हा चौथ्या स्थानावर आहे. या मतदार संघात चार लाख एक हजार 419 मतदार आहेत. कसब्यात दोन लाख 72 हजार 744 मतदार झाले आहेत. या मतदार संघात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त झाली आहे. पुरुष मतदार हे एक लाख 35 हजार 215 असून, महिला मतदार या एक लाख 37 हजार 502 आहेत. तृतीयपंथी मतदार 695 आहेत. पुणे कँन्टोंन्मेंमध्ये मतदार संख्या ही दोन लाख 69 हजार 588 झाली आहे. पर्वती मतदार संघात तीन लाख 34 हजार 136 मतदार झाले आहेत, तर शिवाजीनगरमध्ये दोन लाख 72 हजार 798 मतदारांची नोंदणी झाली असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी चिंचवड मतदार संघ हा जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार असलेला ठरला आहे. या मतदारसंघात पाच लाख 95 हजार 408 मतदार झाले आहेत. पिंपरी मतदारसंघात तीन लाख 64 हजार 806 मतदार आहेत. भोसरी मतदारसंघामध्ये पाच लाख 35 हजार 666 मतदारांची नोंदणी झाली आहे.

मतदारसंघ आणि मतदार संख्या
वडगाव शेरी – 4,52,628
शिवाजीनगर – 2,72,798
कोथरूड – 4,01,419
खडकवासला – 5,21,209
पर्वती – 3,34,136
हडपसर – 5,62,186
पुणे कँटोन्मेंट – 2,69,588
कसबा पेठ – 2,72,747
———————–
एकूण मतदार – 30,86,711

जिल्ह्यातील दहा मतदार संघ
मतदार संघ-मतदार संख्या
जुन्नर 3,08,439
आंबेगाव 2.98,598
खेड आळंदी 3,45,035
शिरुर 4,29,818
दौंड 2,99,260

इंदापूर 3.18,924
बारामती 3,64,040
पुरंदर 4,14,690
भोर 3,97,845
मावळ 3,67,

ग्रामीणमध्ये शिरूर प्रथमस्थानी
जिल्ह्यामध्ये असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिरूर विधानसभा मतदार संघ मतदारसंख्येत प्रथमस्थानी आहे. या मतदारसंघात चार लाख 29 हजार 818 मतदार झाले आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांत कमी म्हणजे दोन लाख 98 हजार 598 मतदार आहेत.

Back to top button