कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या | पुढारी

कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांच्या पत्रान्वये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणसाठी या बदल्यात सहा पोलिस निरीक्षक बदलून आले आहेत. सोमवारी (दि. २२) रात्री बदल्यांचे आदेश काढण्यात आले. बदली आदेशानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या पोलिस निरीक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, तसेच बदली झालेल्या ठिकाणी पोलिस निरीक्षकांनी त्वरित हजर राहावे, असे आदेश फुलारी यांनी दिले आहेत.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कोठून- कुठे) : संदीप रंगनाथ कोळेकर (कोल्हापूर ते सांगली), राजेंद्र सदाशिव सावंत्रे, अविनाश भुपाल कवठेकर, राजेंद्र बापू मस्के, अरविंद रंगनाथ काळे (कोल्हापूर ते सातारा), भैरू अंतु तळेकर, प्रकाश दामोदार गायकवाड, ईश्वर दौलतराव ओमासे, (कोल्हापूर ते सांगली), संतोष श्रीमंत घोळवे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), शिवाजी मारुती गायकवाड (सांगली ते कोल्हापूर), नारायण शिवाजी देशमुख (सांगली ते पुणे ग्रामीण), जितेंद्र प्रभाकर शहाणे (सांगली ते सातारा), संदीप किसनराव भागवत (सातारा ते सांगली), नवनाथ कोंडिबा मदने (सातारा ते पुणे ग्रामीण), निंगाप्पा रंगप्पा चौखंडे, महेश किसनराव इंगळे (सातारा ते कोल्हापूर), विलास शामराव भोसले, सचिन दिनकर पाटील, दिलीप शिशुपाल पवार (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), यशवंत कृष्णा नलावडे (पुणे ग्रामीण ते सातारा), संजय शंकर जगताप, नारायण विनायकराव पवार (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), महेश कृष्णराव ढवाण (पुणे ग्रामीण ते सांगली), विनय रामचंद्र बहिर (सोलापूर ग्रामीण ते सांगली), दीपरतन गोरख गायकवाड, गोरख कृष्णा गायकवाड व अरुण ज्ञानदेव फुगे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण) आणि अशोक गुलाब सायकर (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर)

Back to top button