चार हजार चपात्या.. तर 50 किलो चटणी ; आंदोलनकर्त्यांसाठी सरसावले अनेक हात

चार हजार चपात्या.. तर 50 किलो चटणी ; आंदोलनकर्त्यांसाठी सरसावले अनेक हात

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना मराठा समाज बांधव मदत करत आहेत. आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील ग्रामस्थांनी मराठा समाजातील आंदोलकांसाठी 4 हजार चपात्या व 50 किलो लसणाची व 50 किलो शेंगदाण्याचा खर्डा रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील मुक्कामी सोमवारी (दि. 22) सायंकाळी साडेसहा वाजता पोहोच केला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीपासून पदयात्रेद्वारे मुंबईच्या दिशेने निघाले आहे. सोमवारी रांजणगाव येथे मुक्कामी असताना मराठा मोर्चा समन्वयक शरदराव पोखरकर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, निखिल भोर, सरपंच नारायण बांगर, सर्जेराव पडवळ, गणेश देसले यांनी गावातील ग्रामस्थांना मराठा आंदोलन सहभागी असलेल्या बांधवांना जेवण देण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार खडकी ग्रामस्थांनी भरभरून मदत देत ग्रामस्थ महिलांनी 4 हजार चपात्या, शेंगदाण्याचा खर्डा 50 किलो व लसणाची 50 किलो चटणी जमवून रांजणगाव येथे मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांना नेऊन दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news