Pune News : चिल्ड्रेन ट्राफिक पार्क अखेर सुरू.. | पुढारी

Pune News : चिल्ड्रेन ट्राफिक पार्क अखेर सुरू..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणाच्या वयातच मुलांना वाहतुकीचे नियम, चिन्हे आदी विषयीची माहिती करून देण्यासाठी महापालिकेने उभारलेले औंध येथील ट्रॅफिक पार्क अखेर सुरू झाले आहे. वाहतुकीचे विविध नियम काय आहेत. नियमांची चिन्हे, त्या चिन्हांचा उपयोग, अर्थ काय अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना होण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने औंध येथील ब्रेमेन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे. लहान मुलांना सोप्या पद्धतीने नियम कळतील, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या भागात पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, चौक, स्वतंत्र सिग्नल, पादचारी क्रॉसिंग, तर दुसर्‍या भागात वाहतूक सुरक्षेसंदर्भातील माहिती चिन्हे, मराठी-इंग्रजीमध्ये माहिती, वाहतुकीसंबंधी 2 ते 3 मिनिटांचा माहितीपट आदींचा समावेश आहे.

हा प्रकल्प सप्टेंबर 2022 मध्ये सुरु झाला. त्याला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु नंतर शाळांकडून विद्यार्थी पाठविणे बंद झाल्याने हा पार्क बंद पडला होता. तो पुन्हा सुरु करण्यात आला आहे. या गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी खासगी आणि महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जात आहेत. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी दोन बस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक शाळानिहाय पार्कच्या भेटीचे नियोजन केले गेले आहे. या पार्कमध्ये 4 मीटर रुंद आणि 160 मीटर लांबी रस्त्याची प्रतिकृती, रस्त्याच्या प्रतिकृतीमध्ये दुहेरी मार्गिका, पार्किंग व्यवस्था, तीन-चार रस्ते मिळणारे चौक, सिग्नल यंत्रणा, स्वतंत्र सिग्नल यंत्रणेसह सुरक्षित पादचारी क्रॉसिंग, वाहतूकविषयक चिन्हांचे फलक, सर्व चिन्हांची मराठी व इंग्रजी भाषांमध्ये फलकांवर अर्थासह माहिती, विविध रंगांच्या वाहन नंबर प्लेट, वाहतूक चिन्हांचे फलक, विद्युत खांब, सिग्नल याची हुबेहूब प्रतिकृती आहे.ॉ

हेही वाचा

Back to top button