शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला प्राधान्य : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला प्राधान्य : खासदार सुप्रिया सुळे

भोर : पुढारी वृत्तसेवा : केंद्रात इंडिया, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला प्राधान्य देऊ. अंगणवाडी सेविकांच्या पगारात वाढ करू. तुमच्या जीवनात आनंद पहायचा असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
भोर येथील सह्याद्री मंगल कार्यालयात शनिवारी ( दि.20) खा. सुळे यांच्या पुढाकारातून अंगणवाडी व आशासेविका, मदतनीस यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, तालुका कार्याध्यक्ष संदीप नांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे, शहराध्यक्ष यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवकाध्यक्ष गणेश खुटवड, गणेश तुपे, महिला तालुकाध्यक्ष विद्या यादव, वंदना धुमाळ, हसीना शेख, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

खा. सुळे म्हणाल्या, सध्या देशात व राज्यात असणार्‍या सरकारमुळे महागाईचा भडका उडाला आहे. भुलभुलय्या करून जनतेची फसवणूक करणार्‍या दोन्ही सरकारला पुढील काळात गोरगरीब जनता धडा शिकवणार आहे. केंद्रात इंडिया तर राज्यात महाविकास आघाडीचे स्वाभिमानी सरकार आणणार आहे. खा. सुळे यांच्या प्रयत्नातून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.

प्रथम क्रमांकाचे दुचाकीच्या मानकरी मेघा सावंत (नर्‍हे ), शुभांगी बोडके (वाढाणे), पद्मा रांजणे (आंबाडे ), द्वितीय – पैठणी
साड्या – मनीषा शिर्के (म्हसर खुर्द), रंजना खाटपे (वाठार हि. मा.), शोभा जेधे (आंबवडे), तृतीय – ओव्हन – लता तुपे (वरवडी बुद्रुक), निर्मला म्हस्के (पळसोशी), रंजना पांगुळ (वेळवंड). प्रत्येक महिलेस खास भेटवस्तू देण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button