मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार फेब्रुवारीत रामलल्लाचे दर्शन | पुढारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार फेब्रुवारीत रामलल्लाचे दर्शन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असताना या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. त्याऐवजी ते फेब्रुवारीत मुहूर्त ठरवून संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार आणि आमदारांसह अयोध्येला जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत माहिती देताना म्हणाले की, 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. सोबतच खासदार, आमदार, अधिकारी आणि रामभक्तही असतील. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्यासाठी राज्यातील अनेकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे आपण एकट्याने दर्शन घेण्यापेक्षा सर्वांना घेऊन अयोध्येला जाऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण 22 तारखेला अयोध्येला जाणार नाही. फेब्रुवारीत वेळ ठरवून आम्ही एकत्र रामलल्लाचे दर्शन घेऊ. आता कारसेवा संपली असून रामसेवा करायची असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्रिमंडळ आणि खासदार, आमदारांसह अयोध्येला जायचे असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही वेळ निश्चित करून अयोध्येला जाऊ, असे सांगितले.

Back to top button