बारामतीला चारदा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने.. : अजित पवार | पुढारी

बारामतीला चारदा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने.. : अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. योजना राबविल्या जात आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात असे काम झाले नाही. आपल्याकडे अनेकदा मोठी पदे आली. चारदा मुख्यमंत्रिपद मिळाले, पण अशा योजना आल्या नव्हत्या, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.

उंडवडीत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंप उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, चारदा मुख्यमंत्री पद आणि अन्य महत्त्वाची पदे आल्यानंतर सुद्धा बारामतीत इतके काम झाले नव्हते. दुदैवाने मोठ्या योजना मंजूर होवू शकल्या नव्हत्या. एकट्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचीच 65 कोटींची कामे सुरू आहेत. वस्त्रोद्योग मंडळाकडून 9 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बारामती बाजार समितीचा सेस फंड किती आहे, इतर बाजार समित्यांची अवस्था आज काय आहे, याची जरा माहिती घ्या.

हेही वाचा

Back to top button