विमानांची उड्डाणे रद्द होण्याची मालिका थांबेना; पुन्हा 12 विमानांची उड्डाणे रद्द | पुढारी

विमानांची उड्डाणे रद्द होण्याची मालिका थांबेना; पुन्हा 12 विमानांची उड्डाणे रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरून ये-जा करणार्‍या विमानांना सातत्याने खराब हवामानाचा फटका बसत आहे. गुरुवारी (दि.18) पुन्हा 12 विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यातून जाणारी सहा आणि पुण्यात येणारी सहा विमाने गुरुवारी रद्द झाल्याची नोंद विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असून, आता त्यांना विमान प्रवास करू की नको, असाच प्रश्न पडत आहे.

गुवाहाटी, हैदराबाद, मंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, गोवा, कर्नाटक भागासाठी जाणारी विमान उड्डाणे गुरुवारी रद्द झाली. गेली काही दिवस सातत्याने उत्तरेकडील भागात असलेल्या दिल्लीसाठीची विमाने सातत्याने रद्द होत असल्याचे समोर येत होते. गुरुवारी मात्र दिल्लीचे विमान रद्दची नोंद विमानतळ प्रशासनाने केली नसल्याचे दिसून आले. याबाबत पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके म्हणाले, खराब हवामानामुळे गुरूवारी 12 विमान फेर्या रद्द झाल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी संबंधित विमान कंपन्यांकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या. तसेच, पुणे विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून सुध्दा प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button