Leopard News : कडूस येथे बिबट्या आढळला मृतावस्थेत | पुढारी

Leopard News : कडूस येथे बिबट्या आढळला मृतावस्थेत

कडुस : पुढारी वृत्तसेवा : कडूस (ता. खेड) मधील गोलापूर येथे साधारणतः नऊ महिन्याच्या बिबट्याचा मृत्यू झाला. गोलापूर येथिल शेतकरी संदिप पोटे हे त्याच्या शेतात बुधवारी (दि.१७) विद्युत पंप मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतात बिबट्या एकाच जागेवर पडून असल्याचे त्यांनी पाहिले. हा बिबट्या हालचाल करत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.

परिसरात भिमा नदीचे पाणी उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगल झाडी असून दोन दिवसापुर्वी परिसरात दोन बिबटे, तसेच वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी बघितले होते. यामध्ये दोन बिबट्याच्या झटापटीत एका बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल दत्तात्रेय फापाळे, वनरक्षक सागर तांबे, वनकर्मचारी मोराजी बढे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृत बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी राजगुरूनगर येथे नेण्यात आले असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button