लोणावळ्यात नारायण राणे यांचा निषेध | पुढारी

लोणावळ्यात नारायण राणे यांचा निषेध

लोणावळा : शंकराचार्य यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्र्‍या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोणावळ्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून निषेध करण्यात आला. लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
या वेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कविश्वर, शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, माजी नगरसेवक पप्पू नासिर शेख, शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, मारूती खोले, नरेश काळवीट, एकनाथ जांभुळकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पायगुडे, राजूभाऊ बोराटी, अशोक बोंद्रे, रामभाऊ थरकुडे, आनंद बक्षी, विजय आखाडे, श्रीकांत कंधारे, फिरोज शेख, जाखिर खलिफा, परेश बडेकर, रवींद्र टाकळकर, प्रशांत आजगेकर, गणेश फरांदे, जितेंद्र ठोंबरे, उत्तम ठाकर, सुमित भोसले आदी सहभागी झाले होते.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यास शंकराचार्‍यांनी नकार दिला आहे. या कार्यक्रमाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत शंकराचार्‍यांनी सरकारवर निशाणा साधला होता. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मातील शंकराचार्‍यांचे योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे लोणावळ्यात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button