राष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धा पुण्यात होणार; 17 व 18 फेब्रुवारीला आयोजन | पुढारी

राष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धा पुण्यात होणार; 17 व 18 फेब्रुवारीला आयोजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नावीन्यपूर्णतेला वाव देणारी राष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धा पुण्यात होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेने इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ’इनोव्हेट यू टेकाथॉन 2024’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा 17 आणि 18 फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी शनिवारी (दि.6) पत्रकार परिषदेत दिली.

नवउद्योजक घडवण्याचे प्रयत्न

महाराष्ट्रात हॅकॅथॉनसारख्या स्पर्धेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. यातून अनेक उद्योजक घडू शकतात. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहे. ग्रामीण भागातील कल्पक प्रकल्पांना व्यवसायात उतरण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा इनोव्हेशन फाउंडेशन आणि आयओआयटीचा मानस असल्याचे कल्पेश यादव आणि डॉ. प्रदीप माने यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button