Mumbai : मुंबईत थंडगार वारे; पारा विशीच्या आत | पुढारी

Mumbai : मुंबईत थंडगार वारे; पारा विशीच्या आत

मुंबई : सकाळी आणि संध्याकाळी थंड वारे वाहू लागले. त्यातच पारा विशीच्या आत आल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये थंडी परतण्याची शक्यता वाढली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील पारा विशीच्या आत आला. किमान तापमान १७ अंश सेल्सिअसवर आले. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमान वाढले. (Mumbai)

कमाल तापमान पस्तिशीवर पोहोचले. महाराष्ट्रात थंडीची लाट आली तरी मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला तापमानात घट अपेक्षित होती. आयएमडीच्या सांताक्रूझ केंद्रावर रविवारी किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके होते. काल सकाळी थंडगार वारे वाहू लागल्याने सोमवारी तापमानात आणखी घट अपेक्षित आहे. आज पारा १८ अंश सेल्सिअसवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Back to top button