तळेगाव दाभाडे : दूर डोंगरी आणि दर्या खोर्यातील रुग्णांच्या रोगांचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञांना तत्काळ करता यावे, यासाठी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील एनएमआयइटी शैक्षणिक संस्थेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित संशोधन केले असून, त्याबाबतचा शोधप्रबंध (रीसर्च पेपर) टेलर अॅण्ड फ्रान्सिस या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिध्दीसाठी सादर केला आहे. हा शोधनिबंध स्वीकारला गेला असून, त्यावर संशोधक विद्यार्थी शिवम सिंग आणि मार्गदर्शक डॉ. सी. डी. कोकणे लवकरच तज्ज्ञांच्या कमिटीसमोर सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना गुरुवारी दिली.